39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ गोंदिया उपाध्यक्षपदी शिव शर्मा तर तिरोडा उपाध्यक्षपदी पालांदुरकर

गोंदिया उपाध्यक्षपदी शिव शर्मा तर तिरोडा उपाध्यक्षपदी पालांदुरकर

0
22

गोंदिया,दि.१०-गोंदिया व तिरोडा नगरपरिषदेच्या आज उपाध्यक्षपदासाठी व स्विकृत सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी भाजपसेनेने विजय मिळविला आहे.एकीकडे भाजपसेनेत दुरावा निर्माण होत असतानाच तिरोडा येथे मात्र भाजप सेनेचे सौख्य दिसून आले.गोंदिया नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे शिव शर्मा तर तिरोडा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुनिल पालांदूरकर यांची निर्विरोध निवड करण्यात आली.गोंदिया नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्विकृत सदस्यापासून रोखण्यासाठी बसप,शिवसेना व अपक्षांनी आघाडी करीत बसपचे नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार पंकज यादव यांची स्विकृत सदस्यपदी निवड करण्यात आली.भाजपकडून भरत क्षत्रिय व दिनेश दादरीवाल तर काँग्रेसकडून पराग अग्रवाल यांची निवड करण्यात आली.तिरोडा येथे भाजपकडून राजेश गुणेरिया यांची निवड करण्यात आली.तिरोड्यात गुणेरिया यांच्या पत्नी या भाजपकडून नगरसेविका म्हणून विजयी झाल्या आहेत.आता पतीपत्नी दोघेही तिरोडा पालिकेत नगरसेवक म्हणून राहणार आहेत.