शिरसाटे विस्तार शिक्षण अधिकारीपदी रुजू

0
14

गोंदिया दि. १६ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांपासून कनिष्ट शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले निलकंठ शिरसाटे यांची वरिष्ट शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांचे पदोन्नतीने गोंदिया पंचायत समितीत स्थानांतरण झाले. १४ फेबÑुवारी रोजी निलकंठ शिरसाटे यांनी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद सहायक शिक्षक ते वरिष्ट शिक्षण विस्तार अधिकारी अशी त्यांची कारकिर्द आहे. त्यांच्या पदोन्नतीपद्दल मरठा कलार समाज आणि त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.