स्वप्नपूर्ती संस्थेतर्फे मोती सन्मान २०१७ आणि विविध पुरस्कारांचे वितरण

0
18

लाखनी,berartimes.com दि.२३-श्री छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती लाखनीच्या वतीने दि. १९ फेब्रुवारीला शहरात भव्य शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमात स्वप्नपूर्ति बहुउद्देशीय संस्था लाखनी तर्फे दिला जाणारा २०१७ चा “मोती सन्मान” डॉ.सौ.प्रतिभाताई उदयजी राजहंस यांना घोषित करण्यात आला. शिवजयंतीच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते शिवकथाकार अरुणजी नेटके यांच्यासह मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाळाभाऊ काशिवार, लाखनीच्या नगराध्यक्षा कल्पनाताई भिवगडे, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्ष बाबुरावजी निखाडे उपस्थित होते. स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वाघाये यांनी पुरस्कारांची घोषणा केली व त्यासंबंधी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाध्यक्ष खासदार नानाभाऊ पटोले यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांच्ं अभिनंदन केले. उपस्थित अतिथिंनी देखील स्वप्नपूर्तिच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्वप्नपूर्ति तर्फे दरवर्षी दीला जाणारा “मोती सन्मान” डॉ.सौ.प्रतिभाताई राजहंस यांना वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी, गरीब महिला-माता-मूली यांसाठी कमीत कमी खर्चात आरोग्य सोई उपलब्ध, मार्गदर्शन केंद्र, इ.भरीव आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला. सोबतच विशेष प्राविन्यप्राप्त गटात सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत निवड झालेली द लिटल फ्लावर शाळेची विद्यार्थिनी कु. श्रुती कोळवते व विज्ञान विषयात इयत्ता दहावीला सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल यूनिवर्सल शाळेचा विद्यार्थी भावेश जगनाडे यांना आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित वक्तुत्व स्पर्धेत प्रथम गटात (इयत्ता ५ वी ते ७ वी) मध्ये कु.श्रुती कोळवते हिने प्रथम तर कु.पेजल भूरे, प्रतिक ईश्वर यांनी द्वितीय आणि अंजली टिचकुले हिने तृतीय क्रमांक पटकावला. दुसऱ्या गटात (इयत्ता ८ वी ते १२ वी) कु. ख़ुशी बारेवार हिने प्रथम तर विश्वजीत ज़रकारिया याने द्वितीय आणि सौरभ येळणे याने तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्यांना देखील पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात यावेळी नागरीक, विद्यार्थी, महिला उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणाच्या नियोजनसाठी तसेच विविध स्पर्धांच्या यशश्वी आयोजनसाठी किशोरजी वाघाये, अतुल पाटील भांडारकर, अंगेशजी बेहलपांडे, प्राची बेदरकर, सुधीर काळे, नीलेश राऊत, लक्ष्मीकांत ठवकर, माया बोरकर, भारती वाघाये, निखिल काळे, याह्या आकबानी, सुधन्वा चेटुले, भारती वाघाये, अंजली भांडारकर, कविता डुंभरे, सजंयजी वनवे, आशीष राऊत, संदीप बेदरकर, उमेश सिंगनजुडे, सुभाष गरपडे, सचिन अंबादे, नाना गिरेपुंजे, लक्ष्मण बावनकुळे, दौलत लुटे, कमलेश कुंभरे, जय राठोड, बाळासाहेब चव्हाण, विशाल हटवार, अतुल नागपुरे, चंद्रकुमार गायधने, निखिल काडगाये, नितेश टिचकुले, आशीष बडगे, आशा वनवे, जयश्री सिंगनजुडे, स्मिता सिंगनजुड़े, मीनाक्षी सिंगनजुडे, धनश्री निर्वाण तसेच स्वप्नपूर्तिच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन अजिंक्य भांडारकर यांनी तर आभार प्रदर्शन कोमलदादा गभणे यांनी केले.