24.4 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ जिल्हा परिषदेचे आजी-माजी अध्यक्ष पराभूत

जिल्हा परिषदेचे आजी-माजी अध्यक्ष पराभूत

0
32

गडचिरोली, दि. 23 : जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे हे मुलचेरा तालुक्याच्या सुंदरनगर-गोमणी मतदार संघातून पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे रवींद्रनाथ निर्मलशहा यांनी त्यांचा पराभव केला आहे. तर याच तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र रंगय्या ओल्लालवार हे पराभूत झाले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युध्दिष्टीर बिश्वास यांनी ६० मतांनी पराभूत केले.
गडचिरोली तालुक्याच्या वसा-पोर्ला जिल्हा परिषद गणातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अपक्ष उमेदवार बंडोपंत शंकरराव मल्लेलवार पराभूत झाले आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगन्नाथ बाजीराव बोरकुटे यांनी पराभूत केले आहे.21 तारखेला राज्यातील 25 जिल्हा परिषदेसाठी मतदान झाले होते.