दुर्मिळ मालवन प्रजातीच्या सापासह एकाला अटक

0
13

चंद्रपूर,दि.२७-अत्यंत दुर्मिळ असलेल्या मालवन प्रजातीचा सापासह एका युवकाला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने रविवारी रात्री अटक केली असुन आरोपिकडुन मालवन साप जप्त करण्यात आला आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विसापुर – नांदगाव मार्गावर पेट्रोलिंग करत असतांना ही कारवाई करण्यात आली. पोलीसांना मिळालेल्या माहीतिचा आधारे एक युवक कापडाचा पिशवित दुचाकीने मालवन साप घेऊन जात होता मात्र गस्तीवर असलेल्या पोलीसांना त्याचावर संशय आल्याने त्याला अडवण्यात आले व त्याची झडती घेतली असता त्या युवका कडुन मालवन साप जप्त करण्यात आला या सापाचा वापर गुप्तधन शोधण्यासाठी केल्याजात असल्याची माहीती असुन गुप्तधन शोधना-या व मांत्रिकाच्या टोळीकडुन या सापाची मोठी मागनी असते व याची किमंत ही लाखात असते.