अर्जुनी मोरच्या नगराध्यक्षांवर अविश्‍वास प्रस्ताव आज

0
22

अर्जुनी मोरगाव दि.10–: स्थानीक नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा क्रिष्णा शाहारे यांचे विरुद्ध १५ नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी गोंदिया यांचेकडे सादर केला आहे. यावर १0 मार्च रोजी दुपारी १२ वाजता नगरपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून नगराध्यक्षांवर अविश्‍वास येणार का? असे तर्क-वितर्क सद्या शहरात रंगू लागले आहे.
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १६६५ चे कलम ५१-१ अ व ५५ अन्वये कर्तव्य पार पाडताना केलेल्या गैरवर्तणूक, हयगय तसेच लज्जास्पद वर्तनाबद्दल दोषी असल्यामुळे नगराध्यक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास राहिला नाही. असे पत्र १५ नगरसेवकांनी आपल्या स्वाक्षरीसह जिल्हाधिकारी यांना दिले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी १0 मार्च रोजी अविश्‍वास ठरावाच्या संदर्भात विशेष सभा बोलावली असून पीठासीन अधिकारी म्हणून गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च रोजी काढलेली सभेची सूचना मंगळवारी नगरसेवकांना प्राप्त झाली आहे. अर्जुनी मोरगाव नगरपंचायत मध्ये नगरसेवकांची संख्या १७ आहे. यामध्ये भाजपाचे ६, भारॉका-६, राष्ट्रवादी काँग्रेस-२, शिवसेना-१ व अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. विद्यमान नगराध्यक्ष पोर्णिमा शाहारे या भाराकॉ पक्षाच्या आहेत.
विशेष उल्लेखनीय म्हणजे विद्यामान नगराध्यक्षांवर त्यांच्या पक्षातीलच नगरसेवकांनी सुद्धा अविश्‍वास दर्शविला आहे. शिवसेना एक व एक अपक्ष नगरसेवकाने अनुपस्थीमुळे या अविश्‍वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही अशी माहिती आहे. नगराध्यक्ष पद अनु. जाती महिला प्रवगार्साठी राखीव असून भाराकॉ वगळता अन्य पक्षाकडे अध्यक्षपदाचे उमेदवार नाही हे येथे उल्लेखनीय हा अविश्‍वास प्रस्ताव संमत होतो की, बारगळतो याकडे तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.