अदानी प्रकल्पामुळे बाधीत गावांचे स्थानांतरण करा

0
9

तिरोडा दि.10–: येथील अदानी विज प्रकल्पाचे धूर व राखेमुळे मोठय़ा प्रमाणात होणारे प्रदूषणामुळे परिसरातील शेतीवर व नागरिकांना दूर्धर आजार होत असल्याने बाधीत गावांचे स्थानांतरण करण्यात यावे किंवा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अदानी प्रकल्पातून निघणारे दूर व राखेमुळे मोठय़ा प्रमाणात होणारे प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रकल्पातून निघणारी राख व धूर पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतात मिसळल्यामुळे नागरिकांना विविध आजार होत असून शेतीच्या पीकांवरही दूष्परिणाम होत आहे. धूर व राखेचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करावा किंवा बाधीत गावांचे स्थानांतरण करावे, अशा मागण्याचे निवेदन ग्यानीराम ढोबरे, उमेश पारधी, शिवदास पारधी, मुक्ताबाई रहांगडाले, भोजेश्‍वर बारसागडे, इंदीराबाई चौधरी, रोशन ठाकरे इ. मेदीपूर, भिवापूरटोला, उदइटोला येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.