जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला बसपाचा आक्रोश मोर्चा

0
13

वाशीम, दि.18: रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे दलीत महिलेवर सामुहिक बलात्कार करून जाळून टाकण्याची निंदणीय घटना घडली. परंतु दोषींवर कारवाई करण्याऐवजी आरोपींना पाठीशी घालणारे रिसोडचे ठाणेदार डुकरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयकुमार चक्रे यांना निलंबित करून सहआरोपीं करावे. उर्वरीत 6 आरोपींना अटक करावी, आदी मागण्यासाठी बसपाचे प्रदेश महासचिव अ‍ॅड. संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे 32 वर्षीय महिलेच्या घरात घुसुन तिच्यावर सामुहिक बलात्कार करून जाळून टाकल्याची दुदैवी घटना 7 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये 65 टक्के जळालेल्या पीडित महिलेचा उपचारादरम्यान 6 मार्च रोजी दुपारी मृत्यू झाला. पीडित महिलेची जबानी असलेली ध्वनिचित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी आपली फिर्याद नोंदवून न घेता, आरोपींना अभय दिले. दोषींवर कडक कारवाई करण्याऐवजी आरोपींना पाठीशी घालणारे रिसोडचे ठाणेदार डुकरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयकुमार चक्रे यांना निलंबित करून सहआरोपीं करावे. उर्वरीत 6 आरोपींना अटक करावी तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरवर गुन्हे दाखल करावे. आदी मागण्यासाठी बहुजन समाजबांधवानी 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून पीडितेला न्यायाची मागणी केली.
हा अक्रोश मोर्चा शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून बसस्थानक मार्गे, तहसिलकार्यालय, सिव्हिल लाईन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मध्ये जिल्ह्यातील समाजबांधव उन्हातान्हात सहभागी झाल्या होते. उपस्थित महिलांनी हातात निषेध बोर्ड घेत दोषींवर कडक शिक्षा झालीच पाहीजे, नराधमांना फाशी द्या, आदी घोषणांनी परीसर निनादून सोडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला अक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला असता, मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सत्यसोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, क्रांतिज्योती सावित्री विचार मंचच्या जिल्हाध्यक्षा गिर्‍हे, बसपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश वानखडे यांनी तिव्र रोष व्यक्त व्यक्त करीत आरोपींना पाठीशी घालणार्‍या दोषी पोलिस अधिकार्‍यांवर कडक कारवाई करून त्या नराधमांना फाशी देण्याची मागणी केली.यावेळी बसपाचे प्रदेश महासचिव संदीप ताजने, जिल्हाध्यक्ष अविनाश वानखडे, देवानंद मोरे, प्रकाश आठवले, भिमरत्न वानखडे, अ‍ॅड. संघरत्न मोरे, विजय सावळे, पंडीत बन्सोड आदींची उपस्थिती होती.