कचारगडच्या विकासासाठी खा.नेतेंनी केली आदिवासीविकास मंत्र्याशी चर्चा

0
12

गोंदिया,दि.१८-आदिवासीचे श्रद्धास्थान असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थानच्या विकासा संदर्भात तसेच गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रातील आदिवासी क्षेत्राच्या विकासासंदर्भात खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्युअलजी ओरम यांची भेट घेऊन विकासासाठी निधी मिळण्यासंदर्भात चर्चा केली.सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असून खा.नेते यांनी संसदभवन परिसरातील आदिवासी विकास मंत्री यांच्या दालनात ओरम यांची भेट घेतली.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी सांगितले की,कचारगड हे फार प्राचीन देवस्थान असून याठिकाणी विदर्भातील ७- ८ जिल्ह्यासह ४ ते ५ राज्यातील भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी येत असतात मात्र येथे सोयीसुविधांचा अभाव असून नागरिकांना राहण्याची सुविधा नाही त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो.भाविकांचा त्रास कमी करून त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी याठिकाणी भक्तनिवास, पाण्याची सुविधा व इतर व्यवस्था मिळण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्याची मागणी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ओरम यांच्याकडे केली.यावेळी केंद्रीय आदिवासी मंत्री ओरम यांनी या क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आदिवासी क्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन दिले.