माळी महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
11

भंडारा दि.18: लाखांदूर येथील अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी पाशवी अत्याचार करून तिची चित्रफित काढून सोशल मीडियावर प्रसारीत करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सदर मुलगी १0 व्या वर्गात आंबेडकर विद्यालय, लाखांदूर येथे शिकत आहे. घटनेच्या दिवशी २५ फेब्रुवारी रोजी ही पीडित मुलगी शाळा आटपून घरी आली होती. तिच्या घरची परिस्थिती हलाखीची व गरिबीची असल्यामुळे तिला दररोज मजुरीसाठी शेतात जावे लागते. तिच्या आईच्या सांगण्यावरुन ती शेतावर मजुरीसाठी जात असताना तिच्यावर अनेक दिवसांपासून पाळत ठेवून असलेल्या पाच नराधमांनी तिला वाटेत अडवून तिच्या तोंडात बोळा कोंबून डोळ्यावर पट्टी बांधून नराधमांनी गावापासून १0 कि. मी. अंतरावर दुचाकीने जंगलात नेले व तिच्यावर अत्याचार केला.
ही घटना पीडिताला आरोपींनी कोणालाही सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना जिवे मारू अशी धमकी दिली. त्यामुळे ती मुलीने भयभीत होऊन झालेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. परंतु या प्रकरणात असणार्‍या आरोपींनी तिच्यावर अत्याचार करताना काढलेली चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे मुलीच्या अब्रुचे वाभाडे निघाले. पीडित मुलगी व तिचे कुटुंब या घटनेमुळे प्रचंड घाबरुन गेले.
या प्रकरणातील आरोपी इसारार ख्वाजा खॉ पठाण, सलीम अहेमद खॉ पठाण, चेतन सुरेश निनावे, सागर रमेश हुकरे, सौरभ उपरे रा. लाखांदूर यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी माळी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.१५ दिवस गुन्ह्याची नोंद होईपर्यंत सदर प्रकरणाची चित्रफीत सोशल मीडियावर फिरत होती. त्यामुळे जिल्ह्यातील सायबर गुन्हे शाखा, गुप्तहेर विभागाचे लक्ष कुठे होते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पीडित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी या प्रकरणाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा, अशी मागणी माळी महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
मोर्चात अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर लिंगे, उपाध्यक्ष अँड़ राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत भुसारी, माधुरी देशकर, प्रकाश अटाळकर, बंडू बनकर, रेखा भुसारी, रविकिरण भुसारी, विजय शहारे, नितेश किरणापूरे, अनिल डोंगरवार, भागवत किरणापूरे, रमेश गोटेफोडे, हेंमत नागरिकर, अनिल किरणापूरे, ललित नागरिकर, राधेश्याम आमकर, नामदेव कांबळे, पवन तिजारे, प्रवीण पेटकर, नाना आदे, अमोल गुरूनुले, रोहिणी पाटील, गायत्री इरले, कैलास जामगडे, प्रकाश लोखंडे, अँड़ श्रीकांत नागरीकर यांच्यासह महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.