न.प.ची करवसुलीसाठी मोहीम;मालमत्तेला सील लावण्याचा सपाटा

0
10

तिरोडा दि.22:नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले असून थकीत करवसुलीकरिता मुख्याधिकारी उरकुडे यांच्या नेतृत्वात धडक मोहीम उघडण्यात आली असून नागरिकांना वारंवार सूचना देऊनही कर न भरणार्‍यांचे मालमत्तेत सील लावणे सुरू केले असून यात २0 मार्च रोजी शहीद मिश्रा विद्यालयाच्या समोरील गजेंद्र नखाते यांच्या मालमत्तेत सील लावण्यात आले असून आणखीही काही मालमत्तेला सील लावण्यात येणार आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट तिरोडा नगरपरिषदेने ठेवले असून यापैकी ७५ टक्के करवसुली वसूल झाली आहे. २५ टक्के थकीत असलेल्या करवसुलीकरिता मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, लेखाधिकारी झामसिंग चव्हाण, शाखा अभियंता सचिन मेश्राम, संदीप सूर्यवंशी, नागेसे लोणारे, संजय परमार, दिगंबर लेंडे यांच्यासह इतर कर्मचार्‍यांचे पथकाद्वारे करवसुलीकरिता थकीत कर न भरणार्‍यांविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे.२५ मार्चपर्यंत कर न भरल्यास होर्डिंग लावून थकीत करदात्यांची नावे लिहिण्यात येणार आहेत.थकीत करदात्यांनी कर भरून नगरविकासाकरिता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.