सभागृह व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
13

तिरोडा दि.29–:ग्रामपंचायत एकोडी अंतर्गत येणार्‍या रामपुरी येथे आ. विजय रहांगडाले यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या सभागृह व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ. रहांगडाले यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला कृऊबास प्रशासक डॉ. वसंत भगत, जि. प. सदस्या शैलजा सोनेवाने, धनेंद्र अटरे, जयप्रकाश बिसेन, अजाबराव रिनाईत, महेंद्र बघेले, नीरज सोनेवाने, रवी पटले, सुरेश पटले, फेकलाल चौधरी, देवलाल टेंभरे, मंगला भदाडे, सविता राणे, अशोक रिनाईत, गौरी बिसेन, उमेश पटले, राकेश बिसेन, कमलेश सोनेवाने, अशोक हरिणखेडे तसेच मोठय़ा संख्येने गावकरी उपस्थित होते.