24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ शिक्षक समितीच्यावतीने डाॅ.आबेंडकरांच्या जयंतीनिमित्त शितपेयाचे वितरण

शिक्षक समितीच्यावतीने डाॅ.आबेंडकरांच्या जयंतीनिमित्त शितपेयाचे वितरण

0
25

गोंदिया,दि.14-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा गोंदियाच्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंचायत समिती समोर शितपेयाचे वितरण करण्यात आले.त्या आधी बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राला माल्यर्पन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प.सदस्य विनोद अग्रवाल,बहुजन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रतन वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षित,एल यु खोब्रागडे,डी एल गुप्ता, शिक्षक समिती शाखा गोंदियाचे अध्यक्ष बी. आर. दिप, अनुप नागपूरे, रोशन मस्करे, गणेश चौहान, जी एम बांते, मनूताई ऊके, टेलन बन्सोड, गोपीका डहाटकर, सुनील बावनकर, डी व्ही चेलानी, पी.बी सर्याम,माधव टेभरे, राजू राहागडाले, यु सी तुरकर, नितू डहाट,हेमंत कावळे, षुष्पा बोरकर, एस बी बोंबर्डे,आय एल पटले, विरेन्द्र कावळे, मटानी, सुरेश आष्टीकर, यु जी हरिनखेडे, आर पी बोदेले, हेमकृष्ण टेभुर्णे, एम पी नागपूरे राजेन्द्र नागपूरे, छाया कोसरकर व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.