25.2 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ जनशक्ती संस्थेच्यावतीने ताक वितरण

जनशक्ती संस्थेच्यावतीने ताक वितरण

0
24
गोंदिया,दि.16- जनशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने येथील भीमनगर चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ताक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे युवा साहित्यिक उदय चक्रधर, संस्थेचे अध्यक्ष नवनीत भाष्कर, रंजू वासनिक, सुनिल चव्हाण, निणर्य गणविर,रेणुका वासनिक,जयकिशोर भाष्कर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या ताक वितरणाचा लाभ अनेक आंबेडकरी अनुयायांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्मला ,अमर ऊके, अंजू राकेश बोरकर,पिंटू डोंगरे, छाया भाष्कर,अरूणकुमार भाष्कर, चंदन साखरे, राहुल बोरकर,मनोज गोंडाने यांनी परिश्रम घेतले.