34.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ नक्षल्यांनी केली युवकाची हत्या

नक्षल्यांनी केली युवकाची हत्या

0
22

गडचिरोली,दि.२६:पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(दि.२५)रात्री धानोरा तालुक्यातील पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत दुर्गापूर येथील एका युवकाची गोळ्या घालून हत्या केली. सेवकराम हिचामी(२६)असे मृत युवकाचे नाव आहे.काल रात्री १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी दुर्गापूर येथे गेले. त्यांनी सेवकरामला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि त्याची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह हटझर गावाजवळच्या रस्त्यावर नेऊन ठेवला. नक्षल्यांनी सेवकरामच्या मृतदेहावर एक चिठ्ठीही ठेवली होती. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका मानवाधिकार संघटनेशी जुळलेल्या व्यक्तीला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.जेव्हा गोंदिया पोलीसांना विचारणा केल्यावर असे नसल्याचे सांगितले जात आहे.ज्या युवकाला ताब्यात घेण्यात आले तो मानवाधिकार संघटनेचा विभागीय अध्यक्ष म्हणून वावरत होता असे बोलले जात असून या संघटनेत काही सेवानिवृत्त वरिष्ट पोलीस अधिकारी असल्यानेच त्या युवकाच्या ताब्यात घेण्याबाबत गुप्तता पाळली जात असावी अशी शंका वर्तविली जात आहे.