यवतमाळात अमीर खानची वाटर कप स्पर्धेत हजेरी

0
13

यवतमाळ,दि.26- राज्यातील विविध गावांमध्ये पानी फाऊंडेशनच्या वॉटर कपला सुरूवात झाली असून हजारो हात पाणी वाचवण्यासाठी आणि दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी एकत्र आले आहेत. अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हेही त्यात मागे नाही.प्रसिध्द चित्रपट अभिनेता आमीर खान आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर व यवतमाळ येथे वाटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आमीर खान आणि पाणी फाऊंडेशनच्या  साथीदारांनी कधी सॅटलाईटने तर कधी प्रत्यक्ष गावात भेटी देऊन पाहणी सुरु केली आहे.

याच वाटर कप स्पर्धेच्या पाहणीसाठी आज आमीर खान यवतमाळ येथे आला होता. यावेळी त्याला पाह्ण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. आमीर सोबत त्याची पत्नी किरण राव आणि पाणी फाऊनडेशनचे इतर सदस्य देखील उपस्थित होते. आमीरने फक्त स्पर्धेचे आयोजनच केले नाही तर तो स्वतः गावोगावी जाऊन या कामांची पाहणी देखील करत आहेत. आणि आमीरचा उत्साह पाहून स्पर्धेत भाग घेतलेल्या गावकऱ्यांना देखील उत्साह दिसून येत आहे. आमिर खानने पत्नी किरणसह लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीच्या पट्ट्यातील ओसाड माळरानावर केलेल्या श्रमदानाची चर्चा आता लातूर जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.

लातूर जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नदीच्या पट्ट्यात आमिर खानने चक्क फावडा आणि टिकाव चालवला. एका गावात २० मिनिटे तर दुस-या गावात चार तास खर्च केलेल्या या अभिनेत्याने नुस्ते श्रमदानच केले नाही तर पाण्याची समस्या गावक-यांना कशी आहे ? याची माहिती घेतली. उपाय काय केला पाहिजे ? याची माहिती घेतली.