नव्या मार्केट यार्डात स्थानांतरणाला आडतियांचा विरोध

0
16

गोंदिया दि.30: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य धान मंडीचे स्थानांतरण पार्वती घाट मार्गावरील निर्माणाधीन नवीन धान मंडीत २ मे रोजी करण्यात येणार आहे. याला धान मार्केट आडतिया व्यापारी असोसिएशनने विरोध केला असून, स्थानांतरणापूर्वी नवीन धान मंडीतील सोयीसुविधा पूर्ण करण्याची मागणी केली आहे. परंतु, त्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नसल्याने समितीने स्थानांतरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी आडतिया व्यापारी असोसिएशनने केली असून नव्या मार्केट यार्डात स्थानांतरण करण्यात आले. तर, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर धरणे देण्याचाही इशारा पत्रपरिषदेत दिला. पत्रपरिषदेला प्रमोद अग्रवाल, अशोक मिश्रा, नवीन अग्रवाल, श्यामकुमार अग्रवाल, मनोज अग्रवाल व अन्य उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचा वाढता कारभार लक्षात घेऊन पार्वतीघाट मार्गावर स्व. मनोहरभाई पटेल मार्केट यॉर्ड या नवीन धान मंडीचे निर्माण काम सुरू झाले. निर्माण काम सुरू झाल्यावर काही दिवसात या मार्केट यॉर्डमध्ये भाजी मार्केट सुरू झाले. यादरम्यान, मुख्य धान मंडीचे नवीन धान मंडीत स्थानांतरण करण्यापूर्वी तेथे निलामी शेड, पक्के रस्ते, विद्युत व्यवस्था, सुलभ शौचालय, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, शेतकरी विश्रामगृह, आडतिया सभागृह, कामगार विश्रामगृह, उद्घोषणा कक्ष, व्यापारी गाळे आदी सोयीसुविधा पूर्ण करण्याची मागणी मार्च २0१३ पासून धान मार्केट आडतिया व्यापारी असोसिएशनकडून केली जात आहे. यासंदर्भात वेळोवेळी संबंधित अधिकारी व पदाधिकार्‍यांकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, नवीन धान यॉडर्.ात अद्यापही परिपूर्ण सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवीन धान यॉडर्.ात व्यवहार करतांना व्यापारी व शेतकर्‍यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागणार आहेत. नवीन मार्केट यॉर्डातील भाजी मंडी इतरत्र हलविण्यात यावी, नवीन यॉडर्.ातील संपूर्ण सहा शेड रिकामे करून ओटे बांधण्यात यावे. यॉर्ड परिसरात चारही बाजूला उंच सुरक्षाभिंत तयार करण्यात यावी. यॉर्डात पिण्याचे पाणी व सुलभ शौचालयाची सुयोग्य सुविधा करण्यात यावी. सुरक्षेसाठी पोलीस चौकी निर्माण करून कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी. यॉर्डात पक्के रस्ते तयार करून विज पुरवठय़ाची योग्य उपाययोजना करण्यात यावी. धरमकाट्याची व्यवस्था करून आडतिया व्यापार्‍यांना कमीतकमी भाडे व अमानत रक्कमेवर खोल्या उपलब्ध करण्यात याव्यात. यॉडर्.ात शेतकरी विश्रामगृह, आडतिया व्यापारी सभागृह व उद्घोषणा कक्ष तयार करण्यात यावेत. यॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरा लावून समितीचे आवश्यक कार्यालय व बिल विभाग सुरू करण्यात यावे. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुख्य धान मंडीचे नवीन मार्केट यॉर्डमध्ये स्थानांतरण करण्यास धान मार्केट आडतिया व्यापारांचा विरोध आहे. अपूर्ण व्यवस्थेमुळे आडतिया व्यापारी व शेतकर्‍यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून २ मे रोजी मुख्य धान मंडीचे नवीन मार्केट यॉर्डात स्थानांतरणाचा निर्णय रद्द करावा. असे न केल्यास २ मे रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित आडतियांनी दिला. त्यामुळे आडतिया व कृऊबास संचालक मंडळातील वाद शिगेला पोहचला असल्याचे समोर आले आहे.