वेगळ्या विदर्भासाठी विदर्भात आंदोलन

0
12

नागपूर/गोंदिया,दि.01- वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने रक्ताक्षरी मोहिमेला विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सुरवात करण्यात आली आहे.तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भासाठी काळे झेंडे दाखवून निषेधही नोंदविला आहे.नागपूरात रस्ता रोखण्याच्या प्रयत्न करणा-या 10 ते 12 विदर्भवाद्यांना काॅपी हाऊस चौकात पोलिसांनी घेतले.राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात बजाजनगर येथील ‘विष्णूजी की रसोई’ येथे सकाळी ९ वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी विविध विदर्भवादी संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जनमंच, विदर्भ कनेक्ट, विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी यासारख्या विविध विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने वामनराव चटप, अ‍ॅड.अनिल किलोर, हरिभाऊ केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धनंजय कर्णिक, अ‍ॅड.मुकेश समर्थ, संदेश सिंगलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.  तर सकाळी साडेनऊच्या सुमारास विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे गिरीपेठ येथील कार्यालयाजवळ वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

गोंदिया-येथेही विदर्भवाद्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात वेगळ्या विदर्भाला घेऊन नारेबाजी केली.विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड.टी.बी.कटरे,दिपा काशीवार,राजेश बनसो़ड,कुंदा भाष्कर,चावला,धावक मुन्नालाल यादव यांच्यासह विदर्भ राज्य आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नेताजी चौकात रास्ता रोको करुन काळे झेंडे दाखवले. तर पाचकंदील चौकातील लोकनायक बापूजी अणे पुतळ्यासमोर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्यात आला.