रोहयो कामावरील महिला मजुराचा उष्माघाताने मृत्यू

0
13

चंद्रपूर,दि.10 : उष्णतामानात प्रचंड वाढ झाली असून, सावली तालुक्यातील लोंढोली येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. शशीकला श्रावण जुवारे (४५, रा. लोंढोली) असे मृत महिलेचे नाव आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत रोहयोची कामे सुरू आहेत. याअंतर्गत लोंढोली येथे सर्वे क्रमांक ४३१ रामदास भांडेकर यांच्या शेतातील बोडीतील गाळ काढणे आणि खोलीकरणाचे काम दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले.

ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या या कामावर गावातील २११ मजूर आहेत. सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंतची कामाची वेळ असून, नेहमीप्रमाणे मंगळवारी शशीकला जुवारे कामावर गेली होती. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत काम केल्यानंतर जेवण झाल्यावर अचानक तिची प्रकृती खालावली आणि यातच तिचा मृत्यू झाला.