24.1 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home विदर्भ गोंदिया जिप प्रशासकीय बदल्यात आर्थिक व्यवहाराची चर्चा:सीईओकडे लक्ष

गोंदिया जिप प्रशासकीय बदल्यात आर्थिक व्यवहाराची चर्चा:सीईओकडे लक्ष

0
13

गोंदिया,दि.११- गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय बदल्या़ना आजपासून सुरवात झाली.दरम्यान सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी आर्थिक व्यवहार करून बदली यादीत सेंटीग करीत असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे.तसेही जिल्हा परिषदेची बदली प्रकिया नेहमी वादात राहिली आहे.गेल्या दिड दोन वर्षात नियमबाह्य कामे सामान्य प्रशासन विभागात झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत.नुकतेच पदोन्नती झालेल्या प्रकरणात बांधकाम विभागात काम करणार्या कर्मचार्याची पदोन्नती पाथरीतील प्रकरणामुळे थाबवण्यात आली जेव्हा की त्या व्यक्तीचा काही संबध नव्हता.असे अनेक घोळ आहेत काल बुधवारला सुट्टी असताना बदली यादी तयार करण्याचे काम शिक्षण विभागात झाले आजही प्रकीयेत काही घोळ सुरु असल्याची चर्चा आहे.