मैत्र ग्रुप साकोली तर्फे बुद्धानच्या मूर्तीचे अनावरण

0
11
साकोली,दि.12 -तालुक्यातील मोहगाटा येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त बुद्धमूर्तीचे अनावरण मैत्र ग्रुप तर्फे करण्यात आले. मोहगाटा येथे नालंदा बुद्ध विहार असूनही तिथे बाबासाहेब आणि बुद्धाची मूर्ती नाही ही अडचण लक्षात घेऊन मैत्र ग्रुप चे राकेश भास्कर व निलेश घरडे यांनी गावकर्यांना बुद्ध मूर्ती स्थापना संबंधी मदतीचे आस्वासन दिले. बुद्ध विहाराकरिता व मूर्ती स्थापन करिता लागणारे साहित्य मैत्र ग्रुप तर्फे पुरविण्यात आले. आलेबेदर येथील भन्तेच्या हस्ते विधिवत बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. ह्यावेळी समाज प्रवर्तक शब्बीर पठाण ह्यांनी ह्यावेळी बुद्ध व त्यांचा धम्म ह्याविषयी प्रकाश टाकला. मूर्ती स्थापन नंतर गावकऱ्यांनी गावभोजनाचा आस्वाद घेतला.
ह्यावेळी मैत्र ग्रुप चे दीपक जांभुळकर, निलेश घरडे तथा गावकरी  रमेश टेकाम, सुनंदा फंदे पोलीस पाटील, सागर बोरकर ग्राम, सदस्य,   उमेश शेंडे, मोरेश्वर न्यायमूर्ती, पौर्णिमा ताई रामटेके, दयाराम रामटेके, वामन रामटेके, भिकराम खोब्रागडे, पुरशुत्तम कुंभरे, पुरशुत्तम रामटेके, विजय रामटेके, राजेश रामटेके, रोशन रामटेके, शंकर पटले, प्रतिमा देशपांडे, पुसपा गोडाणे, सुनीता रामटेके, सुदालता रामटेके, प्रणाली रामटेके उषा रामटेके, आशा रामटेके, आशिष देशपांडे, ग्यानिराम गोडाणे, प्रभुदास गोडाणे, अजित मेश्राम, सुमन मेश्राम, मलिंद्र वैद्य, रोशन मेश्राम,
यांची उपस्थिती होती.