गोंदिया फस्ट ड्रामेबाज एक्टींग स्पर्धेचा फायनल शनिवारला

0
16
 गोंदिया:- सिध्दीविनायक बहुउद्येशिय क्रिडा संघ गोंदिया व्दारे हॅलो किड्स प्रीप्रायमरी स्कूल व फेम डान्सींग/म्युजीक अ‍ॅकेडमी गोंदिया फस्ट ड्रामेबाज एक्टींग स्पर्धेचा  मेगा फायनल उद्या शनिवार दि. १३ मे रोजी भवभुती रंगमंदीर येथे संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण न.प. अध्यक्ष अशोकराव इंगळे, महिला बाल सभापती अनिता सतिश मेश्राम, श्रीमती सई अभिमन्यू काळे,माजी जि.प.सदस्य विनोद अग्रवाल  यांच्या उपस्थितीत होणार आहे. चिमुकल्यांचे उन्हाळी शिबिर घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून एक्टींग कॉम्पीटशन घेण्यात येत आहे.   चिमुकल्यांचे प्रोत्साहण वाढविण्यासाठी कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन  महेंद्र माने, नरेंद्र मेश्राम,  धर्मराज काळे, सिमा बडे, सतिश मेश्राम यांनी केले आहे.