पत्रकार दिवस ६ जानेवारी रोजी

0
66

गोंदिया,दि. ५, ब्रिटिश राजवटीमघ्ये देशभक्तीवर विचार समाजात रुजविण्याच्या व समाज सुधारण्याच्या उद्देशाने प्रथमच छापण्यात आलेल्या दै.दर्पण चे संपादक आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारीतेचे जनक म्हणून ओळखले जातात. मराठी पत्रकारीतेची पायाभरणी करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिनिमित्य ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केल्या जातो.
जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ जानेवारी रोजी राईस मिलर्स असोसिएशन सभागृह येथे सकाळी ११ वाजता पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून गोंदिया-भंडारा विधानपरिषदेचे सदस्य राजेंद्र जैन, आमदार गोपालदास अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, राइस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सी. अग्रवाल, न.प. चे मुख्य अधिकारी सुमंत मोरे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार दिनानिमित्त परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. ङ्कवर्तमान मे समाचार पत्रो की आवश्यकता नागरिक पत्रकार और प्रशासन की भूमिकाङ्क हा परिसंवादाचा विषय ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांव्दारे करण्यात आले आहे.