शिक्षक संघाचे सामाजिक न्याय मंत्र्याना निवेदन

0
14

गोंदिया- राज्य सरकारने गोंदिया जिल्ह्यातील वगळलेल्या चार तालुक्यांना पुर्ववत नक्षलग्रस्त क्षेत्रात समावेश करुन शिक्षकांसह इतरांना न्याय देण्यात यावे,या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजी.राजकुमार बडोले यांना सोमवारी देण्यात आले.शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष व गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात गोंदिया,आमगाव,गोरेगाव व तिरोडा तालुके हे नक्षलप्रभावी क्षेत्रातून वगळण्यात आले आहेत.परंतु आजही ही तालुके अतिसवेंदनशील म्हणून असल्याने याठिकाणी कार्यरत कर्मचाèयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यातच या निर्णयामूळे मिळणारे लाभ व सुविधावर परिणाम पडणार आहे.त्यामुळे शासनाने पुनविचार करुन वगळलेली तालुके पुन्हा समाविष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे.