राज्यात नव्या ३१६५ तलाठी साझ्यांना मंत्रीमंडळाची मंजुरी

0
5

मुंबई,दि.१६- राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या आज मंगळवारला पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकित राज्यात ३१६५ नवे तलाठी साझे व ५२८ मंडळांना मंजुरी देण्यात आल्याने महसुल विभागातील या पदावर नोकरभरतीची संधी युवकांना उपलब्ध होणार आहे.सोबतच राज्यातील विजेच्या मागणीला लक्षात घेऊन परळी येथे नवीन संच बसविण्यास मंजुरी देण्यात आली.सोबतच राज्यातील सर्व क आणि ड वर्ग महापालिकांसह सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील मालमत्तांची जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित मालमत्ता आकारणी करण्यास मंजुरी देण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकित इतर विषयावरही चर्चा करण्यात आली.
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये ३१६५ नवीन तलाठी साझे व ५२८ नव्या मंडळ कार्यालय निर्मितीला मान्यता देण्यात आली.ई-एसबीटीआर द्वारे मुद्रांक शुल्क भरण्याची किमान मर्यादा पाच हजाराहून १०० पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियमांच्या अंमलबजावणीत येणाèया अडचणींचा विचार करून त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नायब तहसिलदार व तहसिलदारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे.परळी औष्णिक विद्युत प्रकल्पात २५० मे. वॅ. क्षमतेचा नवीन संच बसविण्यासाठी २०८१ कोटी रुपये तसेच चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत विस्तारित प्रकल्पासाठी १ हजार ५०४ कोटी ४२ लाख आणि कोराडी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील संच क्रमांक ८, ९ आणि १० साठी २ हजार १४६ कोटी ५९ लाख रुपये प्रकल्प खर्चास मंजुरी देण्यात आली.नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त महाविद्यालयातील कार्यरत शिक्षकेतर अधिकारी-कर्मचाèयांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय आजच्या बैठकित मंजुर करण्यात आला.