‘हागणदारीमुक्त जिल्हा’ म्हणून नागपूरचा गौरव

0
9

नागपूर दि.01-:: हागणदारी मुक्तीसाठी जिल्ह्याने अतिशय वेगाने केलेल्या कामांची दखल घेत हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून राज्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर व मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांचा गौरव करण्यात आला.दरवाजाबंद माध्यम अभियानाचा शुभारंभ तसेच हागणदारीमुक्त झालेल्या राज्यातील ११ जिल्ह्यांचा गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.