प्रोग्रेसिव्ह विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

0
5

गोंदिया :दि.01- महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डातर्फे मार्च २0१७ इयत्ता १२ वीचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदियाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह विज्ञान कनिष्ठ महाविद्यलयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शंभर टक्के निकाला दिला.

ज्यामध्ये आरती कापगते ९0.७७ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून अव्वल स्थनावर राहिली तर राहुल रोडा ९0.३१ टक्के गुण घेऊन द्वितीय स्थानावर राहिला. त्याचबरोबर आयुष चंदवानी ८७.0७ टक्के, आकांक्षा बघेले ८५.८४ टक्के, अनुकृती रहांगडाले ८३.२३ टक्के, मनीष दिघोरे ८२.७७ टक्के, सौरभ गणवीर ८१.५४ टक्के, पलक कटरे ८१.२३ टक्के, मनोज गुप्ता ८१.0८ टक्के, गायत्री मोहनकर ८0.७७ टक्के तर अंजली रहांगडाले ८0 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली.