तंबाखू सोडण्याचा निर्धार करा-डाॅ.धकाते

0
33

भंडारा,दि.3 -तंबाखुच्या सेवनामुळे फक्त खाणाराच नाही तर त्यांचे संपूर्ण परिवार मृत्युच्या दारी येते. म्हणून आज जागतिक तंबाखु नकार दिनाच्या निमित्ताने तंबाखु सोडण्याचा निर्धार करा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविशेखर धकाते यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक तंबाखु नकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी सलाम मुंबई फाऊडेशनचे प्रतिनिधी मुकुंद ठवकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, डॉ. किशोर चाचेरकर, डॉ. शेखर नाईक, डॉ. गोपाल सार्वे, डॉ. कापगते उपस्थित होते. समाजातामध्ये असलेल्या तंबाखुच्या घातक परिणामाचे विस्तृत विेशण करतांना मुकुंद ठवकर यांनी तंबाखुचे दुष्परिणाम सांगून जनतेस तंबाखु सोडण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात असर फाऊंडेशन भंडारा यांच्या उत्कृष्ट पथनाट्याद्वारे करण्यात आली. याद्वारे तंबाखुमुळे लहान मुलांचे आयुष्य कसे वाया जाते या बद्दल प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दंत चिकित्सक डॉ. मनिष बत्रा यांनी केले. संचालन प्राजक्ता पेठे यांनी तर आभार एनसीडी जिल्हा कार्यक्रम समन्वय डॉ. शैलेशकुमार कुकडे यांनी मानले. डॉ. सुधा मेश्राम यांनी उपस्थितांना तंबाखु न खाण्याची शपथ देवून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. सोनटक्के यांनी तंबाखु सोडण्याचा निर्धार केला.
कार्यक्रमानिमित्त जिल्हा रुग्णालय येथे एकूण २५ रुग्णांची कर्करोग तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १0 कर्करुग्ण निदानित करण्यात आले व ४ संशयित आढळून आले असून पुढील उपचारासाठी त्यांना संदर्भित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रियंका मिर्शा, लिलेश्‍वर निखारे, मनिष दयाल व संपूर्ण एनसीडी व इतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.