शिवसेनेचा माॅयल प्रशासनाविरोधात डोंगरीत रस्ता रोको

0
8

तुमसर,दि.08 : ९५ दिवसांपासून पीडित कुटुंबावर होत असलेल्या डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ तथा शेतकऱ्यांनी १५ मेपासून मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. तत्पूर्वी ५ मार्चपासून साखळी उपोषण सुरु केले. परंतु खाण प्रशासन पीडित कुटुंबाची दखल घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेने खाणग्रस्त पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारला आंदोलन केले.मॉईल प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे शिवसेनेने मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चार तास रास्ता रोको करून गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख व पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, संदीप वाकडे, अमीत मेश्राम, तालुकाप्रमुख नरेश उचिबगले, किशोर चन्ने, उपतालुकाप्रमुख प्रकाश लसुन्ते, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर, उपशहर प्रमुख जगदीश त्रिभुवनकर, वाहतूक सेना शहरप्रमुख किशोर यादव, उपशहर प्रमुख कृपाशंकर डहरवाल, दिलीप सिंगाडे, धर्मेंद्र धकेता, नरेश टेंभरेसह शिवसैनिक व पीडित ग्रामवासीयांनी मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. दरम्यान तहसीलदार गजेंद्र बालपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस निरीक्षक नागरे आंदोलनस्थळी पोहचले आणि आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला.