वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

0
12

चंद्रपूर,दि.10 : चंद्रपूरजवळील वलनी-चिचपल्ली दरम्यान शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी-चिचपल्ली दरम्यान घडली. बिबट्याचे वय हे दोन वर्षांचे असल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले. बिबट्याचा मृतदेह वन विभागाने ताब्यात घेतला आहे.