आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे डाॅ.तुमसरेनी धनादेश देऊन केले सांत्वन

0
18

लाखांदूर,दि.10- तालुक्यातील खोलमारा येथील कर्जाला कंटाळून गळफास लाऊन आत्महत्या केलेल्या शेतकरी ईश्वर मदनकर यांच्या कुटुंबियांची डाॅ.अजयराव तुमसरे यांनी भेट घेऊन 10 हजार रूपयाचा धनादेश देऊन सांत्वना केली. यावेळी शेतकर्यांनी आत्महत्या करू नका असे भावनात्मक आवाहन केले.लाखांदूर तालुक्यातील खोलमारा येथील ईश्वर मदनकर या 45 वर्षाच्या तरूण शेतकर्यानी कर्जाला कंटाळून स्वताःच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. यंदा उन्हाळी धानपिकाची लागवड ईश्वर ने केली होती मात्र विद्यूत विभागाच्या जाचक अटिमुळे धान पिकाला पुरेसा पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शेतातील धान पिकं वाळल्या गेल्याने यंदा उत्पादनात कमालीची घट झाली होती. सोसायटीचे कर्ज हात ऊसने घेतलेले पैसे कसे फेडायचे या विवंचणेत ईश्वर होता. आपण कर्जाची परतफेड करू शकणार नाही अशी भिती मनात आल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली. ईश्वर च्या पाठिमागे 35 वर्षीय पत्नी वंदना मुलगा सौरभ15 वर्ष मुलगी प्राची 12 वर्ष असा कुटूंब असून ते आता पोरके झाले आहेत. खासदार नाना पटोले यांनीही पिडीत कुटूंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले परंतु आर्थिक मदत केली नसल्याची खंत कटूंबाने बोलून दाखविले.

यावेळी मृतकाच्या कुटुंबाला मानुसकी दाखवत डाॅ. अजयराव तुमसरे यांनी स्वताजवळून 10 हजार रूपयाचा धनादेश देऊन सांत्वन केले आणी शेतकर्यांनी आत्महत्या करू नका अशी विनंती केली . यावेळी मंदार खेडिकर जगदिश सुर्यवंशी डाॅ. ओम येळे आणी गावातील बहूसंख्येने उपस्थित राहून हळहळ व्यक्त केली.