कर्जमाफीसाठी कांग्रेसचा चिमूर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

0
10

चिमूर,दि.11:-महाराष्ट्रात शेतकरी संपावर आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिची चिमूरच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा कांग्रेस कमेटी जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके याच्या  नेतृत्वात  मोर्चा  काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात राज्यातील शेतकरी सततच्या नापिकिमुळे ,दुष्काळ, अवकाळी पावसामूळे आर्थिक  संकटात सापडल्याने कर्जबाजरी झालेला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे सर्व कर्जमाफ करण्यात यावे अशा उल्लेख करण्यात आला आहे.  भाजप सरकारने नोटबंदी करून आम जनतेला अडचणीत आणले असून शेतकरी हिताच्या मागण्यासांठी कांग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा बुटके यांनी दिला आहे.
शेतकऱ्याची संपुर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे  ,कृषी पंपाचे वीज बिल मोफत करून वीज पुरवठा करणे, शेतकऱ्यांना मोफत बियांणांचा पूरवठा करण्यात यावे या मागण्या घेऊन नेहरू चौक बुटके निवास येथून मुख्य मार्गाने मोर्चा घोषणा देत उपविभागीय  अधिकारी कार्यालयावर पोचला.यावेळी  राजू देवतळे , संजय घुटके ,विजय डाबरे, राजू लोणारे, उपसभापती शांताराम सेलवतकर यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली. मोर्च्यात  नप विरोधी गट नेते अब्दुल  कदीर शेख ,नगरसेवक विनोद ढाकुंनकर,अविनाश अगडे,सुधीर जुंमडे, अंकुश ननावरे,सुधीर पंदिलवार,बाळू बोभाटे,मनीष नदेशवर,पंस सदस्य गीता कारमेगे, रत्नमाला सोनुले ,विजय डाबरे, गोपी दांडेकर, अंकुश बरेकर ,अरुण कारमेगे ,रामदास चौधरी, सूर्यवनशी, विनायक खाटे, आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.