वाहनाला कट मारल्याच्या रागात पोलिसाने झाडली गोळी

0
8

गोंदिया,दि.11-गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील ढिमरटोली(तुमखेडा) येथील गोंदिया -कोहमारा मुख्य मार्गावर आज सायकांळी सात वाजेच्या सुमारास आपल्या वाहनाला कट मारुन पुढे गेल्याचा राग मनात ठेवून बाचाबाची करीत असताना एका पोलिस शिपायाने आपल्या जवळील रिव्हाल्वरमधून दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली.गोळी झाडणार्या पोलिस शिपायाचे नाव भैय्यालाल किनाके असे आहे.पोलिस शिपाई किनाकेने झाळलेल्या गोळीमुळे घटनास्थळावर वाद झाल्याने चौकात उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्या पोलिसाची चांगलीच धुलाई केली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिस शिपाई किनाके हे आपल्या पत्नीसह मोटारसायकलने गोंदियाकडे जात होते.दरम्यान ढिमरटोली जवळ त्यांच्या मोटारसायकलला संदिप रहांगडाले नामक युवकाने कट मारुन पुढे गेला.यावरुन पोलिस शिपायाने वाहन थांबवून त्यास शिविगाळ केली.दरम्यान दोघामध्ये चांगलेच भांडण झाले या भांडणातच शिपायाने आपल्या जवळील बंदुक काढून गोळी चालविल्याचे घटनास्थळावरील लोकांचे म्हणने आहे.पहिला राऊंड चालविल्यानंतर दुसरा राऊंडची गोळी चालविली ती त्याचौकात मासे विकण्यासाठी बसलेल्या एका मच्छिमाराच्या जवळून गेल्याने पुन्हा जमाव भडकला आणि त्या जमावाने त्या पोलिसांची पत्नीसमक्षच चांगली पिटाई केली.पत्नीने वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले परंतु आक्रोशीत जनता एैकायलाच तयार नव्हती अशी चर्चा आहे.या मारहाणीत पोलिस शिपाई चांगलाच जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर पोलिस शिपायाच्या वाहनाला कट मारणार्या संदिप रहागंडाले नामक युवकावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.गोंदिया ग्रामीण पोलिसांनी सदर घटना घडल्याचे कबुल करीत सध्या दोघावर उपचार सुरु असल्याचे सांगितले.