नागपूर : मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याप्रती सरकार संवेदनशील आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या अन्यायकारक बदलीविरोधात विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी संघटनांच्या प्रतिनिधींना अधिकार्यावर अन्याय करण्यात सरकारचा कसलाही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. डॉ.कांबळे यांना लवकरच चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात येईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सुनील तलवारे, पी. एस. खोब्रागडे, शिवदास वासे, सच्चिदानंद दारुंडे, डॉ. शंकर खोब्रागडे, अजय गजभिये, राजीव झोडापे, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, अरुण गाडे, प्रा. राहुल मुन, राजेश बोरकर, भैया शेलारे, डॉ. अनिल हिरेखन, अमन कांबळे आदी उपस्थित होते