नागपूर : प्रभारी अधिकार्यांच्या भरवशावर चालणार्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आणखी एक धक्का बसला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांनी गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
डॉ. गोमाशे यांनी शिवाजी महाविद्यालयातून ‘लीन’ घेत २ वर्षांपूर्वी कुलसचिव पद स्वीकारले होते. लवकरच ते वयाची ६0 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यामुळे ६२ वर्षापर्यंत वाढीव सेवेसाठी त्यांना किमान सहा महिने महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक या पदावर काम करणे गरजेचे आहे. त्यासाठीच गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत राजीनामा सादर केला. डॉ. गोमाशे ३१ मार्चला कुलसचिवपद सोडून महाविद्यालयात रुजू होतील.
कुलसचिव गोमाशे यांचा राजीनामा
वाढदिवसाच्या शुभेच्छा