मोटारसायकल अपघातात तीन युवक गंभीर जखमी

0
7

अहेरी, दि.१८: मोटारसायकल घसरुन खड्ड्यात पडल्याने तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अहेरी-नागेपल्ली मार्गावरील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वळणावर घडली. उमेश लक्ष्मण मडावी(२५), रफिक शिवदयाल कोडापे(२३) व सत्यनारायण चिन्ना मडावी(२४) अशी जखमींची नावे असून, ते मांड्रा येथील रहिवासी आहेत.उमेश, रफिक व सत्यनारायण हे तिघेजण आज सकाळी खासगी कामासाठी मांड्रा येथून मोटारसायकलने अहेरीला आले होते. काम आटोपल्यानंतर परत जात असताना नागेपल्ली येथील लोकबिरादरी प्रकल्पाजवळच्या वळणावर मोटारसायकल घसरुन ती रस्त्यावरच्या दगडाला आदळली आणि त्यानंतर ती खड्ड्यात गेली. यामुळे तिघांनाही जबर मार लागला. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तिघांनाही अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.