25.4 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ आमदार झनक अपघातात जखमी

आमदार झनक अपघातात जखमी

0
19

वाशिम,दि.26- जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या वाहनाला चांडस येथे अपघात झाल्याने ते किरकोळ जखमी झाले असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी ६.४५ वाजता दरम्यान घडली.मांगूळ झनक येथून मालेगाव येथे येत असताना त्यांचे वाहन (एम एच ३७ जी ४५११) चांडस फाट्यानजीक असलेल्या रेतीच्या गंजावरून उसळले. या अपघातात झनक यांना किरकोळ मार लागला तर चालक श्याम ठाकरे, अंगरक्षक गिऱ्हे, वैजनाथ घायाळ आणि सखाराम आंबेकर हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर वाशिम येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.