दोन बल्ब आणि पंखा, वीज बिल 75 कोटी!

0
9

रायपूर (वृत्तसंस्था),दि.26:  दोन खोल्यांचे घर त्यामध्ये दोन बल्ब आणि दोन पंखे याचे वीज बिल तब्बल 75 कोटी रुपये? हो हे खरे आहे. एका कामगार महिलेला तब्बल 75 कोटी रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले आहे. हे बिल पाहताचा सरिता यादव या महिलेला धक्काच बसला. संपूर्ण आयुष्यात आपण एवढी वीज कधीच वापरलेली नसताना अचानक ऐवढे बील आले कुठून? असा प्रश्नही तिला पडला.हा प्रकार छत्तीसगड राज्यातील कोरबा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. यासंदर्भात जेव्हा छत्तीसगातील एका पत्रकाराने जेव्हा याप्रकरणी छत्तीसगडच्या राज्य वीज वितरण कंपनीच्या संचालकाला याविषयी विचारले तेव्हा त्याने ‘हे नजरचुकीने झाले आहे. तुम्ही मला या बिलासंबंधी माहिती द्या, मी ते दुरुस्त करुन घेईन.’ असे उत्तर दिले. हे बिल पाहताच सरिता यादवला धक्काच बसला. याप्रकरणी तिने वीज वितरण कार्यालयात जाऊन वीज बिल दुरुस्त करुन देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच तिला हे बिल दुरुस्त करुन मिळेलही पण या निमित्ताने वीज वितरण व्यवस्थेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे