23.8 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ धानोरा तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रिया रद्द

धानोरा तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रिया रद्द

0
23

गडचिरोली, दि. .२९:- धानोरा तालुक्यात ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेली कोतवालांची भरतीप्रक्रिया विभागीय आयुक्तांनी एका आदेशान्वये रद्द केली आहे.धानोरा येथील तहसील कार्यालयांतर्गत धानोरा तालुक्यात कोतवालाच्या ८६ पदांकरिता २०१५ मध्ये कोतवाल भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या कोतवाल भरतीची लेखी परीक्षा ४ ऑक्टोबर २०१५ रोजी घेण्यात आली होती. तथापि प्रशासकीय कारणास्तव ४ ऑक्टोबर २०१५ रोजी घेतलेली कोतवालपदाची परीक्षा रद्द करुन विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये कोतवाल भरतीप्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी दिली आहे. तसेच नव्याने करावयाची कोतवाल पदाची भरतीप्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री.गणवीर यांनी स्पष्ट केले आहे.