अगोदर समाजातील चांगला माणूस बना -आमदार संजय पुराम

0
24
वाढदिवसाच्या शुभेच्छा

बिजेपार : स्वदेशी खेलोत्तेजक मंडळ तालुका सालेकसाच्या वतीने तालुका स्तरीय पाच दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद््घाटन आमगाव-देवरी विधानसभा क्षत्राचे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेत गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते ग्राम गर्ोे (लोहारा) येथे १0 जानेवारी रोजी जि.प. शाळेच्या मैदानावर करण्यात आले.
या विधिवत पुजाअर्चना करुन धवजारोहन करण्यात आले व खेळाप्रती कोणत्याही प्रकारचा पक्षपात करणार नाही याची खेळाडू व शिक्षकांनी देण्यात आली.
यावेळी मंचावर माजी मंत्री भरत बहेकार, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाबा कटरे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राकेश शर्मा, जि.प. सदस्य श्रावण राणा, सरपंच रमनलाल सलामे, नारायण कटरे, पं.स. सदस्य संगीता शहारे, बीडीओ सी.यु. पचारे, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, डॉ. विवेक अनंतवार, डॉ. रायपुरे, युवराज कटरे, सुकलाल राऊत, खेमराज साखरे, डॉ. संजय देशमुख, उमेदलाल जयतवार, शंकर मडावी, शाळा व्यवस्थाप समिती अध्यक्ष योगराज कटरे, उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित आमदार पुराम यांनी जीवनात डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर किंवा खेळाडू जे व्हायचे ते बना परंतु त्याही पेक्षा समाजातील चांगला माणूस बना असे मत व्यक्त केले. आमदार अग्रवाल यांनी आपण जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि यात कुठलिही राजनिती आणु नका. सर्वांच्या सहयोगाची जनकल्याणकारी कार्य सतत करीत राहणार असल्याचे सांगितले. व त्याचाच एक भाग म्हणून आमची सत्ता असताना गर्ोे येथे प्राथमिक स्वास्थ केंद्र मंजूर करविले असल्याचे सांगितले. गावातील विविध समस्यांच्या बाबतीत आमदारांनी निराकरण करावे असे मत कटरे यांनी प्रास्ताविकात मांडले.