डवकी येथे बिबट्याने केल्या चार शेळ्या ठार

0
13

देवरी, 28 (प्रतिनिधी)- येथून चार किलोमीटर अंतरावरील डवकी येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने चार शेळ्या मारल्याची घटना आज रात्री (ता.28 ) घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डवकी येथील शेतकरी कुवरलाल मयाराम घरत यांच्या गोठ्यातील चारही शेळ्या बिबट्याने मारून ठार केल्या. सकाळी श्री घरत हे आपल्या गोठ्यात गेल्यावर त्यांच्या चारही शेळ्यांचे लचके छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्या. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येते. यामुळे घरत कुटुंबीयांचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी घरत यांचेसह नागरिकांनी केली आहे.