कनेरी संस्थेच्या अध्यक्षपदी धानगाये तर उपाध्यक्षपदी कोरे

0
19

सडक अर्जुनी,दि.01-तालुक्यातील सर्वात मोठ्या आदिवासी विकास सेवा सहकारी सेवा संस्था कनेरीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जागेश्वर धानभाते तर उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे ई.कोरे यांची अविरोध निवड करण्यात आली.या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,लक्ष्मणराव चंद्रिकापुरे,कांग्रेसचे राजेश नंदागवळी आदी मान्यवरानी सहकार्य केले.