आॅगस्टअखेर गोसीखुर्दचे पाणी सोडा-आमदार वडेट्टीवार

0
24

ब्रम्हपुरी,दि.19 : गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पºहे सुकू लागले आहे. पावसाअभावी शेतकºयांचे रोवणे खोळंबल्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकºयांना वरदान ठरणाºया गोसीखुर्द प्रकल्पात पाण्याचा भरपूर साठा असतानाही वेळेवर शेतकºयांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या ३० आॅगस्टपर्यंत गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि सावली तालुक्यातील सर्व शेतकºयांना तातडीने पाणी उपलब्ध करुन द्यावे आणि त्यांची पिके वाचवावी, अन्यथा नागपूर विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने ब्रह्यपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड, चिमूर, मूल या तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी महागडे बि-बियाणे घेऊन धान, सोयाबीन, तूर, कापूस या महत्वाच्या पिकासह इतरही पकांची पेरणी केली. त्यात सावली तालुक्यात २४ हजार ९१४ हेक्टर, ब्रह्मपुरी तालुक्यात २८ हजार ९० हेक्टर, सिंदेवाही तालुक्यात १८ हजार ७२५ हेक्टर या तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ७७ हजार २६५ हेक्टरमध्ये धानपिकाची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यात १ लाख ४० हजार ३८८ हेक्टरमध्ये सोयाबिन, १ लाख ६४ हजार ५९५ हेक्टरमध्ये कापूस, ३४ हजार ७०६ हेक्टरमध्ये तूर, या पिकासह मूंग, उडीद, चवळी, वाल, बरबटी, तिळ, मिरची, हळद या पिकांची पेरणी करण्यात आली. हवामान खात्यानेसुद्धा यंदा चांगला पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले असल्यामुळे श्ेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दगा दिल्याने ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड, चिमूर, मूल या तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व पिके करपू लागली आहे. पावसाळी अधिवेशन संपताच मागील चार दिवसांपासून ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली या तालुक्यात दौरा करुन प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतावर जावून पाहणी केली असता पिकांची बिकट परिस्थिती दिसून आली. पाण्याअभावी पिके करपू लागली आहे. तर जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. येत्या चार- पाच दिवसात पाऊस आला नाही तर शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. असे असतानासुद्धा सिंचन विभागाचे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, असेही आ. वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी संचालक यांना दूरध्वनीवरुन तातडीने गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्यात यावे. शेतकºयांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. येत्या ३० आॅगस्टपर्यंत गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडून ब्रह्मपुरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यातील शेतकºयांना उपलब्ध करुन दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आ. विजय वडेट्टीवार यांनीदिला आहे.