कर्जमाफीच्या विरोधात शेतकºयांचा मोर्चा

0
17

चंदपूर,दि.19:केंद्र व राज्यात सुरू असलेल्या हुकुमशाही धोरणामुळे संपूर्ण देशातच असंतोषाची लाट पसरली आहे. जगाचा पोशिंदा माणल्या जाणाºया शेतकºयांवर अन्यायकारक धोरण लादून त्यांची गळचेपी करण्यात येत आहे. अशातच शेतकºयांना प्रथमत:च संपावर जावे लागले. राज्य सरकारने फसवी कर्जमाफीची घोषणा करून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. याविरोधात गोंडपिपरी येथे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ या अभियानातंर्गत शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गांधी चौक ते तहसील कार्यालय निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व क्षेत्राचे माजी आ. सुभाष धोटे, कृउबा सभापती सुरेश चौधरी, राजीवसिंह चंदेल, कृउबा उपसभापती अशोक रेचनकार, राजुरा तालुकाध्यक्ष दादाजी लांडे, शंकूजी येलेकर, तुकाराम झाडे, माजी उपसरपंच देवेंद्र बट्टे, देविदास सातपुते, हेमंत झाडे, राजु राऊत यांनी केले.
मोर्चात सहभागी शेतकºयांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक धोरणा विरोधात नारेबाजी केली. त्यानंतर तहसील कार्यालय परिसरात सभा झाली. सभेला आमदार सुभाष धोटे यांनी मार्गदर्शन करून राज्य सरकारवर टिका केली. त्यानंतर तहसीलदार किशोर येरणे यांची शिष्टमंडळाने भेट घेवून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या आशयाचे अडीच हजार अर्ज व प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले.