प्रोग्रेसिव स्कूलच्या बसला अपघातः शिक्षिकेसह पाच विद्यार्थी जखमी

0
15
गोंदिया,दि.08-येथील चुलोद स्थित प्रोगेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांना  घेऊन निघालेल्या स्कूलबसला(एमएच 35 के 2766)सोबत गिट्टी वाहतूक करणाऱ्या टिप्पर(एमएच 31.डब्लू 3380)सोबत धडक झाल्याने झालेल्या अपघातात एका शिक्षिकेसह पाच विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9 च्या सुमारास घडली. जखमीमधील एकाची स्थिती नाजूक आहे.4 विद्यार्थ्यांवर खासगी बीजे रुग्णालयात उपचार करुन त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
सविस्तर असे की, स्थानिक प्रोग्रेसिव्ह पब्लीक स्कूलची बस सकाळी नऊच्या सुमाराल विद्यार्थ्यांना घेऊन शाळेच्या दिशेने निघाली होती. दरम्यान छोटा गोंदिया परिसरातील नवीन रिंगरोडवरील राजाभोज चौकात बसचालकाला  क्रास दिशेने येणारा गिट्टी भरलेल्या ट्रक दिसला नसल्याने बस रोड क्रास करण्याकरीता येत असतानाच रेल्वेच्या भागाकडून येणार्या गिट्टीच्या ट्रकचालकाला समोर बस दिसताच त्याने जोरदार ब्रेक मारल्याचे घटनास्थळावरील उपस्थितांनी सांगितले.प्रसंगावधान ठेवत बसच्या चालकानेही ब्रेक मारल्याने दोन्ही बस व टिप्पर एकमेकाला चिपकले.आणि रस्त्याच्या कडेला जात खाली दोन्ही वाहन शिरले.यामध्ये प्रोग्रेसिव्ह शाळेच्या 5 विद्यार्थ्यांसह एक शिक्षीका जखमी झाले असून यश वठेजा या विद्यार्थाला गंभीर दुखापत झाली आहे.घटनेनंतर लगेच गोंदियाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हे स्वतः घटनास्थळावर दाखल आले. यावेळी गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते आणि डॉ. दीपाली खन्ना, गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार दिनेश शुक्ला, शहर ठाणेदार मनोहर दाभाडे,नगराध्यक्ष अशोक इंगळे,शिक्षणाधिकारी उल्हास नरड आणि संस्थाचालक नीरज कटकवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलिस विभागाने अपघातानंतर परिस्थिती नियत्रणांत  ठेवण्यासाठी चाेख बंदोबस्त ठेवला होता.घटनेनंतर पोलीस अधिक्षक भुजबळ यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र चव्हाण,बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांच्याशी चर्चा करीत सदर ठिकाणी भविष्यातील विचार करीत उड्डाणपुल आवश्यक असल्याचे सांगितले.तसेच आरटीओ चव्हाण यांना स्कुलबस नियमांची तपासणी करण्याबाबतचे निर्देश दिले.दोन्ही वाहनांना गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून उपस्थितांनुसार स्कुलबसच्या चालकाचीच चूक असल्याचे सर्वांचे बोलने होते.