गोंदिया- जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात काम करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीतही आपण सर्वांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्यामूळे आपण विकासाची अनेक कामे करु शकलो.पदाधिकारी,कर्मचारी अधिकारी वर्गांने दिलेल्या आदरतिथ्यामूळे तसेच प्रेमामुळे आपण आपल्या गावापासून लांब नव्हे तर आपल्याच परिसरात काम करीत असल्याचे मला जाणवले, असे उद्दगार गोंदिया जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे यांनी शुक्रवारी काढले.श्री शिंदे यांचे गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन स्थानांतरण झाल्यानिमित्त जिल्हा परिषद कमर्चारी अधिकारी कृती समितीच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.त्या निरोप समारंभ कार्यक्रमात ते सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डाॅ.अमित सैनी, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी पाडवी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.रवी धकाते,जिल्हा परिषद सदस्य तुंडीलाल कटरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या हस्ते श्री शिंदे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिवणकर यांनीही विचार व्यक्त केले.तसेच जिल्हाधिकारी डाॅ.अमित सैनी यांनीही विचार व्यक्त करीत शिंदे यांच्यासोबत काम करताना मिळालेल्या अनुभवांचा उल्लेख करीत त्यांना भविष्यातील कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.या कायर्क्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी सहकार्य केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.कळमकर,कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे,कार्यकारी अभियंता उमाशंकर वाकोडीकर,अधिकारी कर्मचारी महासंघाचे सचिव दुलीचंद बुध्दे,समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम,पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.चव्हाण,बांधकाम विभागाचे कार्य. अभियंता लोखंड़े आदी उपस्थित होते.आयोजनासाठी पी.जी.शहारे,विनोद चौधरी,सुभाष खत्री,वैशाली खोब्रागडे,पवार,संतोष तुरकर आदींनी सहकार्य केले.