मोदी-फडणवीसांच्या डिजिटल प्रशासनालाच पालिकेने फासला हरताळ; आठवडा लोटला मात्र जन्मप्रमाणपत्र मिळेना

0
12

गोंदिया,दि.२२;-एकीकडे प्रधानमंत्री नव्हे देशाचे सेवक नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुर्ण भारतच डिजिटल करायला निघालेत.त्यात मग शासकीय कार्यालयासह सर्वच खासगी यंत्रणाचाही त्यात समावेश आहे.परंतु आपल्याच शासकीय यत्रंणा खèया डिजीटल झाल्या का याच शोध घेण्याएैवजी होर्डीगबांजी व जाहिरातीवरच हे सरकार डिजिटल झाल्यामुळेच की काय गोंदिया नगरपालिकेत गेल्या एकआठवड्याआधी अर्ज करुनही अर्जदाराला जन्मप्रमाणपत्र मिळत नसेल तर त्या डिजिटल क्रांतीचा काय उपयोग अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.गोंदिया नगरपालिका क्षेत्राला लागून असलेले कटंगी कला येथील नागरिक गजेंद्र देशभ्रतार हे आपल्या मुलाचे जन्मप्रमाणपत्र बनविण्यासाठी सर्व कागदपत्रासह पालिकेच्या जन्म मृत्यू ,विवाह नोंदणी कार्यालयात १५ सप्टेंबरला पोचले.तिथे त्यांनी संबधित लिपिकाकडे सर्व कागदपत्रही दिले.त्यानंतर तिथे बसलेल्या एका अधिकाèयांने ४० रुपये शुल्कही मागितले.त्या शुल्काची रक्कमही देशभ्रतार यांनी दिली.मात्र त्या शुल्काची पावती प्रशासनाने दिली नाही.त्यानंतर शनिवारला म्हणजे १६ सप्टेंबरला प्रमाणपत्र घेऊन जा असे सांगितले गेले.शनिवारपासून आपल्या मुलाच्या जन्मप्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असल्याने देशभ्रतार हे दररोज पालिकेचे फेरे घालू लागले मात्र आठवडा लोटूनही ऑनलाईनच्या काळात प्रमाणपत्र मिळू शकले नाही.कारण काय तर म्हणे सर्वर डाऊन आहे.विज राहत नाही असे अनेक कारण देत टोलवाटोलवी सुरु असलेल्या या पालिकेच्या कामकाजाचेच नव्हे तर कामकाजातील पारदर्शकतेचेही वाभाडे समोर आले आहेत.विशेष म्हणजे देशभ्रतार यांना आपल्या मुलाचा पासपोर्ट बनविण्यासाठी तातडीने जन्मप्रमाणपत्राची गरज होती,परंतु आदरणीय मोदीजी व फडणवीसजी यांच्या अफाट डिजिटल क्रांतीमूळे सर्वर काम न करु लागल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.त्यातच संबधिताने मुख्याधिकारी चंदन पाटील यांनाही आपली तक्रार भ्रमणध्वनीवर नोंदवली मात्र पाटिल साहेबांनी सुध्दा डाटा ट्रांसर्फर होत असल्याचे सांगून वेळ मारून नेली मात्र आठवड्यापासून फिरत असलेल्या पालकाला त्याच्या मुलाचे जन्मप्रमाणपत्र नेमके कधी मिळेल हे न सांगू शकल्याने पालिकेच्या पारदर्शक प्रशासनाची दखल घेण्यालायक परिस्थिती झाली आहे.