लायंस क्लब तुमसर द्वारे नेत्र तपासणी शिबीर

0
11

तुमसर,दि.06 -लायन्स क्लब तुमसरच्यावतीने विश्व सेवा सप्ताह व गांधी सप्ताह अंतर्गत शासकीय रुग्णालय तुमसर येथे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आला यात १२७ नेत्र रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.यात 8 मोतियाबिंदू रूग्णांचा समावेश होता.यांना मोफत शस्त्रक्रियेसाठी वर्धा येथिल लायन्स हॉस्पीटल येथे पाठविण्यात येणार असून याचा सर्व खर्च लायन्स क्लब करणार अशी माहिती प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. अभय मानकर यानी दिली. अध्यक्षस्थानी ला. राजेश पारधी होते. व प्रमुख उपस्थित रिजन चेअर पर्सन ला सुब्रमण्यमनारायण सिंग व वैद्यकीय अधिक्षक डॉ. म्हैसकर व डॉ. सचिव बाळबुध्दे ,नेत्र चिकीत्सक डॉ. चव्हाण हे होते.यशस्वीतेकरिता ला. किरण जायस्वाल, ला. पप्पु खंडेलवाल, ला. सचिव रोकवार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात शंकरदादा बडवाईक,आशीष कुकडे, उज्वला मेश्राम,कुंदा वैद्य, सुमन अडकने आदी उपस्थित होते. संचालन लायन प्रा. निरजेश वर्मा यांनी केले असून आभार प्रदर्शन सचिव लायन किरण कुमार जायस्वाल यांनी मानले.