अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांची मतदार यादीत नावे नोंदवा-जिल्हाधिकारी काळे

0
19

गोंदिया,दि.06 – महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर १८ वर्ष पूर्ण करणार्या मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे.तरी जिल्ह्यातील १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या तरूण मतदारांनी ३ नोव्हेंबर पर्यंत स्थानिक मतदान केन्द्रावर आपल्या नावांची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पत्रपरिषदेत केले. पत्रपरिषदेला जिल्हा निवडणूक अधिकारी ठाकरे, नायब तहसिलदार आर.आर.मलेवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी ३ ऑ्नटोबर रोजी प्रकाशित करण्यात आली आहे.यादीवरील दावे व हरकती ३ आक्टोंबर ते ३ नोव्हेंबर २०१७ पर्यंत स्विकारले जाणार आहेत.७ आक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर या दरम्यान ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्याचा कार्यक्रम होता.मात्र जिल्ह्यात ग्रामपंचायती निवडणूकीची आंचार सहिता असल्याने तो ज्या ठिकाणी आंचारसहिता आहे त्या ठिकाणी नंतर घेतला जाईल.८ ऑक्टोबर २०१७ व २२ आॅक्टोंबर २०१७ रविवारला विशेष मोहिम राबविली जाणार आहे.५ डिसेंबरला दावे व हरकती निकाली काढुन ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार , अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी ठाकरे यानी दिली. गोंदिया जिल्ह्यात एकुण १०४१०२२ मतदार होते.मागील एका वर्षात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांची संख्या अंदाजे २० हजाराने वाढली असून मतदार यादी पुनरिक्षण उपक्रमात सर्व लोकप्रतिनीधी, राजकीय पक्ष व सामान्य नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी काळे यानी केले आहे.