घन कचर्‍याच्या विक्रीतून गोरेगाव नगरपंचायतीने घेतले उत्पन्न

0
12

गोरेगाव,दि.12 : येथील नगर परिषदेने स्थापना झाल्यापासूनच स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. शहरात दररोज गोळा होणाºया कचºयाची योग्य विल्हेवाट लावून त्यातून उत्पन्न घेवून गोरेगाव नगर परिषदेने आदर्श ठेवला आहे.शहरातील कचरा दररोज गोळा करुन हलबीटोला येथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रात पाठविला जातो. तिथे पॉलीथीन, काच, प्लास्टीक, खरडा, वेगवेगळे केले जाते. जमा झालेल्या विविध कचºयाला कबाडी साहित्याचा व्यवसाय करणाºया त्याची विक्री केली जात असल्याची माहिती न.प. उपाध्यक्ष आशिष बारेवार यांनी सांगितले. गोरेगाव नगर परिषदेने मागील काही महिन्यात जमा झालेल्या कचºयाची विक्री करुन ८ हजार रुपयांचे उत्पन्न घेतले. यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्न वाढविण्यास मदत झाली. स्वच्छतेचे कार्य जर गांभीर्याने केले तर शहरात स्वच्छता तर दिसेलच, शिवाय उत्पन्न ही वाढविले जावू शकते, हे न.प.गोरेगाव ने सिद्ध केले आहे.
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. केरकचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला.याला शहरवासीयांचा सुध्दा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अध्यक्षा सिमा कटरे यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसापासून जमा झालेला कचर्‍यातून नगर पंचायतला ८ हजार २३२ रुपये उत्पन्न मिळाले. घन कचरा व्यवस्थापनाचा पहिला प्रयोग बारेवार यांच्या कल्पनेतून यशस्वी झाला. या नगरातील नाल्या व कचराकुंडीतील कचरा काढून स्थानिक हलबाटोला येथील घन कचरा शेडमध्ये नेऊन कर्मचार्‍यांनी वेगवेगळ्या टाक्यात जमा करून संचय केला व नगरातील कबाडी व्यवसायीकांशी संपर्क केला. घन कचर्‍यातील काच, प्लास्टिक, डिस्पोजल, झिल्ली, पाणी बॉटल, टिन गिरमिट, लोखंड आदी कबाडी व्यवसायीकाने विकत घेण्यास समंती दर्शविताच नगरामध्ये स्वच्छतेतून समृद्धीकडचे निदर्शनास आले. यात नगरातील सफाई कामगारांनी सिहाचा वाटा उचलाला हे विशेष. या घन कचर्‍यातून काच १ हजार १५0 कि.ग्रा., प्लास्टीक, डिस्पोजल ८९ हजार ५00 कि.ग्रा., गिरा गोटा १५0.४00 कि.ग्रा., टीन ६ कि.ग्रा., गिरमिट ३४ कि.ग्रा.आदी व्यर्थ जाणार्‍या व नासाडी करणार्‍या वस्तुंचे योग्य वस्थापन करून त्यातून उत्पन्न घेण्याची कल्पकता इतरही नगरांनी घ्यावी. असा हा स्तुत्य उपक्रम आहे. यापुढेही याच घनकचर्‍यातील निर्माल्य कचर्‍याचे नियोजन करून सेंद्रिय खत निमार्णाचा संकल्प इंजि. बारेवार यांनी व्यक्त केला आहे.